शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
कैलासवासी माजी नगरसेवक एकनाथ दादा थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एकनाथ दादा थोरात फाउंडेशन वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर वृक्षारोपण कार्यक्रम प्रभाग क्रमांक 11 मधील कृष्णा नगर येथे घेण्यात आला.
कोरोना महामारी मुळे ऑक्सीजन चा तुटवडा होऊन अनेक जणांचे प्राण गेले या संकटमय काळात नैसर्गिक ऑक्सिजनची गरज किती महत्त्वाची आहे हे माणसाला समजले आहे. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, सर्वांना नैसर्गिक ऑक्सीजन मिळावे, याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होणे आवश्यक आहे, यामुळे माजी नगरसेवक कैलासवासी एकनाथ दादा थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कुटुंबीयां वतीने तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेविका सौ. मंगलाताई कदम, युवा नेते कुशाग्र कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे योगेश गवळी, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस योगेश मोरे, ओबीसी सेल अध्यक्ष सौ सारिका ताई पवार तसेच अक्षता थोरात, अजिंक्य थोरात आदी मान्यवर उपस्थित होते, सदर कार्यक्रम अक्षता थोरात व अजिंक्य थोरात यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.