शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
दारूच्या नशेत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून कांदा कापण्याची सुरी ने गळा चिरून मित्राचा खून करून फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी बारा तासात बेड्या ठोकल्या. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वराळे येथे गुरुवार (दि. 2) खुणाचा हा प्रकार उघडकीस आला होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 5 या पथकाने ही कारवाई केली.
पिंटू रामतेनु मंडल (रा. कालिया चेक जि. मालदा पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अशोक कुमार (वय 35 रा. कर्नाटक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अशोक कुमार आणि आरोपी पिंटू मंडल हे मित्र होते.
दारू पिऊन त्यांच्यात भांडण झाले आरोपी मंडल याच्या मनात भांडणाचा राग होता. त्यावेळी कांदा कापण्याचे सुरीने त्याने अशोक कुमार याचा गळा चिरून खून केला.
पोलिसांनी घटनास्थळाचा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच पिंपरी-चिंचवड, देहू गाव, तळेगाव, पुणे स्टेशन या भागात पथके रवाना केली. एक इसम हा ससून रुग्णालय येथे संशयरीत्या फिरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळी यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी मंडळ याला ताब्यात घेतले. त्याने अशोक कुमार चा खून केल्याचे पोलिसांना सांगितले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक निरीक्षक राम गोमारे, उपनिरीक्षक राहुल कोळी, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसोडे, सावन राठोड, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, दयानंद खेडकर ,संदीप ठाकरे, श्यामसुंदर गुट्टे, गणेश मालसुरे यांच्या पथकाने केली.