शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील सर्व मनपा शौचालय दुरुस्त करावी, अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठान चे अध्यक्ष निखिल दळवी यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 14 मधील दत्तवाडी, विठ्ठल वाडी तसेच प्रभाग क्रमांक 15 आकुर्डी गाव मधील काही शौचालयांची अत्यंत वाईट दुरवस्था झाली असून, तेथे दरवाजे तुटलेले आहेत. पाण्याचे नियोजन नाही. पाईपलाईन फुटली आहे. तसेच सर्व शौचालयात वीज पुरवठा नाही तर शौचालयाचे भांडी सुद्धा फुटले असल्याने नागरिकांची विशेषता महिला भगिनींची कुचम्बना होत आहे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांकडून केवळ पाण्याची फवारणी केली जाते, परंतु केमिकल टाकून स्वच्छ केले जात नाही. त्यामुळे अनारोग्याच्या गंभीर प्रश्न भेडसावत आहे . तरी याबाबत संबंधित विभागाला कारवाई करणे बाबत सूचना दिल्यास सदर समस्या दूर होऊ शकेल असेही दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.