शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सहकार आघाडी मार्फत नीलमताई हुले यांच्या प्रयत्नातून व मंगेश हिंगणे सरकार यांच्या संयुक्तरित्या आयोजित मोफत कोविड लसीकरणास सोसायटीतील व परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.दोन्ही सोसायटीतील लसीकरनास विक्रमी ६७७ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
या लसीकरण शिबीरास नगरसेवक वसंतभाऊ बोराटे भोसरी हॉस्पिटल चे डॉक्टर भोई यांनी भेट दिली.
आजपर्यंत सहकार आघाडी शहर उपाध्यक्ष सौ नीलमताई हुले यांच्या माध्यमातून महानगरपालिकेमार्फत मोफत रॅपिड अँटीजन टेस्टिंग RTPCR व लहान मुलांचे रेगुलर लसीकरण तसेच कोविड मोफत लसीकरण शिबिराचे मोशी,चिखली,डुडुळगाव दिघी भोसरी वेगवेगळ्या सोसायटीत आयोजन करून नागरिक construction site वर काम करणारे लेबर व मुले असे ३७०० पेक्षा जास्त लोकांना लाभ झाला आहे.
लसीकरण शिबीर यशस्वी करण्यासाठी मा. महापौर राहुल जाधव,सहकार आघाडीचे प्रदिपकुमार बेन्द्रे पालिकेच्या शैलजा भावसार मॅडम प्रभागातील युवा नेते श्री निलेश बोराटे तसेच कार्यकर्ते वेगवेगळ्या सोसायटी पदाधिकारी लक्ष्मण इंदोरे,चिट्टू पारशेट्टी,अजित वाडकर,निलेश सुकाळे,भूषण पाचर्णे,विजय महाजन,चेतन परमार,तुषार पवार,सतीश जरे, अक्षय आहेरकर, वैभव बांखीले,संदीप बोरगे, प्रशांत कुकरेजा,राकेश देठे,राजेंद्र इंगोळे, मारुती परीट पदाधिकारी उपस्थित होते.