शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
वैष्णवी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मॅविक सायकल क्लब मार्फत पर्यावरण पूरक व प्रदूषण मुक्त चर्होली साठी सायकल रॅली काढून पाणी आडवा…पाणी जिरवा, सायकल चालवा… इंधन वाचवा,स्वच्छ गाव… सुंदर गाव,झाडे लावा… प्राणवायू मिळवा, प्लस्टीक चा वापर टाळा…पर्यावरण वाचवा , अशा प्रकारचे सामाजिक संदेश देत चर्होली गावामधून फेरफटका मारत मॅक्झिन चौक येथे सांगता करण्यात आली.
यावेळी मॅविक सायकल क्लब चे सदस्य मयूर पिंगळे, दत्ता घुले, वि.की गवार, जुनेद मुलाणी,पठारे मामा,युवा नेते संतोष तापकीर, वैष्णवी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित तापकीर (पा) तसेच चर्होली ग्रामस्थ व सदस्य उपस्थित होते.
तसेच ज्ञानेश्वरी जयंती निमित्त वैष्णवी फाऊंडेशन तर्फे श्री वाघेश्वर महाराज मंदिर चर्होली बु येथे श्री राम भजनी मंडळ चर्होली बु यांचा भजन संध्या कार्यक्रम आणि जेष्ठ नागरिकांचा सत्कारा चा कार्यक्रम सायंकाळी पार पडला त्यावेळी उपस्थित श्री. तात्या तापकीर, अध्यक्ष काळुराम पठारे,युवानेते अंबर बुर्डे , कृष्णकांत तापकीर, बाळा भोसले, भोसले मामा,वैष्णवी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित तापकीर पा तसेच चर्होली ग्रामस्थ व सदस्य आदी उपस्थित होते.