शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष श्रद्धेय पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरु असलेल्या ‘सेवा व समर्पण’ सप्ताह अभियाना अंतर्गत नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे यांच्यावतीने चिंचवडगावातील सर्व सोसायट्यांमध्ये ‘मतदार नोंदणी अभियान, केंद्र सरकार व महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती व अर्ज वाटप त्याचबरोबर मोफत आधार व मतदार स्मार्टकार्ड’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमाची सुरवात भारतीय जनता पार्टीचे विभाग संघटनमंत्री रविजी अनासपुरे, पिंपरी चिंचवड शहराचे संघटन सरचिटणीस अमोलजी थोरात, शांतीबन सोसायटीचे अध्यक्ष शिवलिंगजी कोडूळे व गोखले वृंदावन सोसायटीचे अध्यक्ष दिलीपजी तसे, सचिव सदनंदजी केळकर, काकडे पार्क सोसायटीचे सचिव राजनजी पाटील यांच्या हस्ते श्रद्धेय पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून चिंचवडगावातील सर्वात मोठी गृह संकुले असलेल्या शांतीबन व गोखले वृंदावन या सोसायट्यांमधून करण्यात आली.
यावेळी ब’ प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठलजी भोईर, पिं.चिं.मनपा वृक्ष प्राधीकरण सदस्य गोविंद पानसरे, भाजपा चिंचवड किवळे मंडलाध्यक्ष योगेशजी चिंचवडे, भाजपा शहर सचिव मधुकरजी बच्चे, भाजयुमोचे प्रदेश सदस्य अजितजी कुलथे, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश सदस्य प्रदिप सायकर, भाजपा सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष धनंजयजी शाळिग्राम, भाजपा सोशल मिडियाचे अध्यक्ष अमेय देशपांडे, भाजपा चिंचवड किवळे मंडलाचे सरचिटणीस रविंद्रजी प्रभुणे, चिंचवडगाव प्रभाग अध्यक्ष मिथुन बोरगांव, राघूशेठ चिंचवडे, वसंतशेठ गुजर, विक्रांत नवले, केदार बावळे, अजय खोल्लम आदी प्रमुख भाजपा कार्यकर्ते व शांतीबन व गोखले वृंदावन गृह संकुलातील नागरिक उपस्थित होते.