शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी साई चौक येथील ग्रेड सेपरेटरचे काम लवकर पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्यात यावा,अशी मागणी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक नाना काटे यांनी मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्र.२८ रहाटणी – पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी साई चौक येथे नाशिक फाटा ते हिंजवडी या बीआरटीएस मार्गावर पिंपळे सौदागर व वाकडला जोडणार्या ग्रेड सेपरेटरचे काम सुरु आहे. या ग्रेट सेपरेटर चा एक मार्ग काही दिवसापूर्वी खुला करण्यात आला असून दुसऱ्या मार्गाचे काम सुरु असून ते खूप संथ गतीने सुरू आहे. या मार्गावर वाहनाची खूप वर्दळ असते सध्या वर्क फ्रॉम होम असल्याने तसेच बहुतेक आटी पार्क बंद असल्याने वर्दळ कमी आहे. ही बाब विचारात घेता माननीय आयुक्त महोदय आपणास विनंती की पिंपळे सौदागर जगताप डेअरी साई चौक येथील ग्रेड सेपरेटरचे संथ गतीने सुरु असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित काँट्रॅक्टर व अधिकारी यांना सूचना देऊन हा ग्रेड सेपरेटर नागरिकांसाठी खुला करण्यात यावा , असेही नाना काटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.