शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
चर्होली बु : येथील वैष्णवी फाउंडेशन तर्फे सामाजिक बांधिलकी जपत यंदाची दिवाळी व भाऊबीज ही अंध,अपंग, एड्सग्रस्त,अशा विविध आजारानी ग्रस्त असणाऱ्या अनाथ मुलींसोबत दिवाळी फराळ, किराणा, कपडे देऊन फटाके फोडून साजरी करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला.
या प्रसंगी वैष्णवी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित तापकीर पा, पी.आय अनुपम पाठक, कु. चेतन लिम्हण, डाॅ. विनोद पटेल, बाळासाहेब गायकवाड, काशिनाथ मिस्त्री, गोलू पटेल, रसिका इंगळे, मधुकर इंगळे, प्रतिक्षा देशपांडे, रूचिरा इंगळे, लक्ष्मण चाळक, ह. भ. प. कृष्णा महाराज कुर्हे, सोमेश मारणे, ओंकार चिले यांचेसह फाऊंडेशनचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
अमित तापकीर यांच्या माध्यमातून नेहमी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून वैष्णवी फाऊंडेशन समाजात गोरगरिबांच्या मदतीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून एक हात मदतीसाठी समाजातून समाजासाठी हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमास समाजातून मोठा प्रतिसाद मिळत असून नेहमी पेक्षा वेगळी व ज्यांचे समाजात कोणी नाही अशा अनाथ भगिनींनकडून भाऊबीज ओवाळून घेऊन सामाजिक बांधिलकी जपली असून नेहमीच सगळे सण अशा प्रकारे साजरे केले जात असल्याचे अध्यक्ष अमित तापकीर यांनी सांगितले.