शबनम न्यूज :- दिल्ली (दि.१८ नोव्हेंबर ) ; केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालया मध्ये तरुणांना सक्षम करणाऱ्या अनेक योजना आहेत,त्या त्यांनी अभ्यासल्या पाहिजे मी त्यांना पूर्ण सहकार्य करेल.असे आश्वासन केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांनी दिले.
भाजपा प्रदेश सचिव श्री अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच राज्या तील युवा उद्योजकांनी त्यांची दिल्ली येथील निवास स्थानी त्यांची भेट घेतली. स्फूर्ती योजना, व्हेंचर कॅपिटल फंड, स्टार्ट अप इंडिया या सारख्या केंद्राच्या अनेक योजना वर सविस्तर चर्चा झाली, उद्योग चालू करण्यासाठी तरुण तरुणींनी पुढे येऊन अभ्यासुवृत्तीने शासकीय योजनांचा फायदा घेणे गरजेचे आहे, असे मा राणे साहेब म्हणाले.
श्री अमित गोरखे यांनी राज्यातील तरुणांकडून आलेली प्रकरणांची शिफारस माननीय मंत्री महोदयान कडे केली.या प्रसंगी श्री प्रशांत तांबे,श्री रवींद्र शेळके ,श्री भीमराव मरसाळे, श्री राज गुप्ता,C A श्री योगेश लकडे उपस्थित होते.