पुणे: “संजीवन समाधीला ७२५वर्ष
पूर्ण होत आहेत, प्रत्येकाने आपले सद्गुण विश्वकल्याणाची संकल्पना साकार होण्यासाठी समर्पित करावेत. प्रतिभावंतांनी जे जगता ते लिहावे आणि जे लिहिता ते जगावे.केवळ समाजाच्या दुःखावर शब्दांची फुंकर घालू नये तर समाज परिवर्तनासाठी,समाज संसाकारीत होण्यासाठी सक्रीय योगदान द्यावे,असे प्रतिपादन पहिल्या आंतरराष्ट्रीय विश्वकाव्य संमेलनाचे अध्यक्ष,विश्व.महात्मा डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी,मुंबई आयोजित अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान व गुणगौरव समारंभ २०२१सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात डाॅ.मधुसूदन घाणेकर बोलत होते.अकादमीच्या सहसंघटक आणि कोषाध्यक्ष सौ.अनुसया खैरे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.याच सोहळ्यात अकादमी तर्फे संस्थापक, संचालक श्री.शिवाजी खैरे यांच्या शुभहस्ते आंतरराष्ट्रीय कीर्तिचे साहित्यिक विश्वमहात्मा डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना साहित्य व कला क्षेत्रातील जागतिक पातळीवरील उत्तुंग कार्याबद्दल ‘ अष्टपैलू जीवनगौरव पुरस्कार-2021 ‘ जाहिर रित्या प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी,ह.भ.प. सर्वश्री प्रल्हाद महाराज सुपेकर,ज्ञानदेव परशुराम पाटील, शकुंतलादेवी ज्ञानदेव पाटील,
अलका भगवान झरेकर तसेच महाराष्ट्र शासनाचे बालविकास प्रकल्प अधिकारी प्रताप पाटील आदि प्रमुख अतिथींना डाॅ.घाणेकर आणि खैरे यांच्या शुभहस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ह.भ.प.प्रल्हाद सुपेकर,अलका झरेकर तसेच प्रताप पाटील यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली.शिवाजी खैरे यांनी अकादमीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच नवोदित कवी मंडळींना मौलिक मार्गदर्शनही केले. कवयित्री सौ.प्रतिमा अरुण काळे( मी प्रतिमा माझी प्रतिमा) आणि सौ.अनुष्का गोवेकर(शब्दवेल)यांच्या काव्यसंग्रहांचे प्रकाशन डाॅ.मधुसूदन घाणेकर आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रा.नीना देसाई,प्रतिमा काळे, अनुष्का गोवेकर यांनी अध्यक्ष,प्रमुख पाहुणे यांचे परिचय करुन दिले.सौ.प्रतिमा काळे,सौ.चंदन तरवडे यांनी सूत्रसंचलन केले.अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय स्पर्धेतील ११३ विजेत्या कवी कवयित्रींना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कारार्थींच्या वतीने बाळकृष्ण अमृतकर,विद्या डोंबे ,मधुकर दुपारे, वर्षा चटपल्ली, ज्योती देशपांडे ,रेणुका गोल्हार आदिंनी मनोगते व्यक्त केली.अक्षय पवार, सविता पाटील,सविता बोराटे,दीपा पराडकर,सुरेखा नाईक,पूनम वाघमारे, अर्चना गरुड,अश्विनी कसबेकर,दत्ता खुळे,मुद्रिका शिंदे,फैरोजा मुल्ला आदि कार्यकर्त्यांचाही डाॅ.घाणेकर आणि खैरे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले.
समारोपात अकादमीचे संस्थापक आणि अध्यक्ष शिवाजी खैरे तसेच सहनिमंत्रक आणि कोषाध्यक्ष अनुसया खैरे यांचा समारंभ अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आले.तृप्ती खैरे यांनी ईशस्तवन,स्वागतगीत आणि
पसायदान सादर केले. श्रीमती सविता पाटील मॅडम यांनी शब्द सुमनांनी सर्वांचे आभार मानणे.