शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१९ नोव्हेंबर ) :- जुलै 2021 मध्ये उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित व्यापारी ,दुकानदार व टपरीधारक यांनी संबंधित तहसिलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन माजी खासदार गजानन बाबर यांनी केले आहे. त्यांनी व्यापारी दुकानदार टपरीधारक यांना आवाहन करताना सांगितले आहे.
की, यापूर्वी शासन निर्णय 11 ऑगस्ट 2021रोजी जुलै 2021 मध्ये उद्भवलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत व्यापारी दुकानदार व टपरीधारक यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मदत करण्यात आली. तदनंतर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये 27 ऑक्टोबर 2021रोजी संबंधित मदत देण्याबाबतचे निकष शिथिल करण्याचे ठरले व त्यानुसार 17 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने ,शासन निर्णय क्रमांक- सी एल एस 2021/ प्र क्र- 203 /भाग -1/म-3 नुसार नियम शिथिल करून आदेश काढण्यात आले आहेत.
तरी पिंपरी-चिंचवड शहरातील तमाम व्यापारी वर्ग असेल दुकानदार असतील तसेच टपरीधारक असतील यांनी 17 नोव्हेंबर 20 21 रोजीच्या आदेशानुसार कागदपत्रे जमा करावीत तसेच आपण संबंधित तहसीलदारांना जाऊन भेटावे असे आवाहन माजी खासदार गजानन बाबर यांनी केले आहे .