नागरिकांनी केला सुदृढ शरीराची काळजी घेण्याचा संकल्प
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस दत्ताभाऊ भगवान गव्हाणे यांचा 7 डिसेंबर रोजी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदिनाथ फ्रेंड सर्कल, शिवसाम्राज्य प्रतिष्ठान व दत्ता भाऊ गव्हाणे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिर श्री प्रभू रामचंद्र सभागृह, गव्हाणेवस्ती ,भोसरी येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिरास परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 354 रक्तदात्यांनी रक्तदान करीत रक्तदान शिबीर यशस्वी केले. या वेळी प्रत्येक रक्तदात्यास फिटनेस बँड देण्यात आले , तसेच आरोग्य शिबीरात ही, अनेक नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली, केंद्र सरकार वतीने राबविण्यात येत असलेले आयुष्यमानभरात कार्ड योजने अंतर्गत या नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड चे वाटप या वेळी करण्यात आले .
यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना दत्ताभाऊ गव्हाणे यांनी सांगितले की समाजाप्रती आपण काही देणे लागतो ही भावना जपत या माझ्या वाढदिवसानिमित्त सदर रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करून एक सामाजिक उपक्रम राबविला आहे तसेच आरोग्य शिबिराचा लाभ घेत सुदृढ शरीराची काळजी घेण्याचा संकल्प नागरिकांनी केल्याने आपले हे सामाजिक कार्य सार्थक झाल्याचे दत्ता भाऊ गव्हाणे यांनी सांगितले.
या शिबिरात या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अनेक मान्यवर ज्येष्ठ नागरिक युवावर्ग महिलावर्ग यांची लक्षणीय उपस्थिती होती या सर्व उपस्थितांचे दत्ताभाऊ गव्हाणे यांनी आभार व्यक्त केले.