कन्सल्टंट संघास विजेतेपद तर पुणे वॉरियर संघाने उपविजेतेपद पटकाविले
शबनम न्यूज | मोशी (दि.१५ डिसेंबर) :- कोविड काळात जिवाची पर्वा न करता अहोरात्र कष्ट करणाऱ्या डॉक्टरांसाठी भव्य टेनिस बॉल फुल पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कन्सल्टंट संघास विजेतेपद तर पुणे वॉरियर संघाने उपविजेतेपद पटकाविले. नगरसेवक वसंत बोराटे आणि डॉक्टर्स असोसिएशन मोशी यांच्या संयुक्त विद्यमाने या टुर्नामेंट उत्साहात पार पडल्या.
पिंपरी-चिंचवड ,मावळ आणि खेड तालुक्यातील डॉक्टरांसाठी या टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २५ संघात सुमारे तीनशे डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. दिनांक ९ ,१० आणि ११ डिसेंबर रोजी या स्पर्धा संपन्न झाल्या.
स्पर्धेचे मानकरी डॉ निलेश पाटील आणि डॉ आनंद कराळे हे उत्कृष्ठ फलंदाज तर उत्कृष्ठ गोलंदाज डॉ श्रीकांत सूर्यवंशी ठरले आहेत. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व मोशी डॉक्टर्स असोसिएशन यांचे सहकार्य लाभले.
याबद्दल अधिक माहिती देताना नगरसेवक वसंत बोराटे म्हणाले, कोविड काळात अहोरात्र रूग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांसाठी या टुर्नामेंटचे आयोजन केले होते.
Advertisement