शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२७ एप्रिल) :- पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन हा रोड हॉकर्स मुक्त व्हावा आशी येथील सर्व सोसायटी मधील नागरिकांनची मागणी होती त्या दृष्टीने आज मा. विरोधी पक्षनेते मा. नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रयत्नातून व सर्व हॉकर्स चालक व्यवसायिक यांच्या सहकार्याने सर्व हातगाडी, पाथारी, विक्रेते यांचे आज रोझलँड सोसायटी शेजारील राजमाता जिजाऊ उद्यान येथील पार्किंग च्या जागेत या कुणाल आयकॉन रोड वरील सर्व हॉकर्सना स्थलांतरित करण्यात आले.
त्यामुळे सर्व कुणाल आयकॉन रोड हॉकर्स मुक्त झाला आहे, यामुळे सर्व नागरिकांना भाजीपाला, फळे खाद्य पदार्थ एकाच ठिकाणी मिळेल त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय देखील दूर होईल. त्याच धर्तीवर येत्या काही दिवसात शिवसाई रोड वरील हॉकर्स चे देखील पिंपळे सौदागर येथील भाजी मंडई येथे स्थलांतर करण्यात येणार आहे व शिवसाई रोड देखील हॉकर्स मुक्त होईल असे नाना काटे यांनी सांगितले.