शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ डिसेंबर) :- झारखंड (रांची) येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . बुधवार दिनांक 15 डिसेंबर 2021, रोजी झालेल्या 41 किलो वजनाच्या गटात पिंपरी-चिंचवड महानगरातील कु. यश विठ्ठल रांजणे याने कास्य पदक मिळवलॆ व पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ही एक पिंपरी चिंचवड शहरासाठी गौरवास्पद बाब आहे.
कु. यश विठ्ठल रांजणे याचे पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने तसेच मा. खासदार गजानन बाबर परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.