शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०२ जानेवारी ) :- भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून तसेच प्रभाग अंतर्गत प्रभाग निहाय भव्य पीच टेनिस बॉल, क्रिकेट स्पर्धेचे आयोजन श्री नवनाथ मारुती ढवळे यांच्या वतीने करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत पुनावळे परिसरातील प्रभाग अंतर्गत ३२ संघानी सहभाग घेतला. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून खेळाडूंचा उत्साह पाहण्याजोगा होता. सर्व खेळाडूंना उपस्थितांचं वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
क्रीडा क्षेत्रात नवीन युवकांनी सहभाग घेऊन आपले करीअर घडवावे, तसेच येणाऱ्या काळात पुनावळे या भागातून अंतरराष्ट्रीय स्थळावर खेळणारा खेळाडू तयार व्हावा, या उद्देशाने आपण यापुढेही अशा क्रीडा स्पर्धेचे आयोजन मोठ्याप्रमाणात करणार असल्याचे यावेळी आयोजक नवनाथ ढवळे यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये भाजप उपाध्यक्ष काळुराम बारणे, स्वीकृत सदस्य संदीप गाडे (सिनेट सदस्य) पुणे विद्यापीठाचे संतोष ढोरे आणि ग्रामस्थ सुरेश रानडे, सुनील ढवळे, अजय ओव्हाळ , राहुल काटे, भरत काटे, मारुती दर्शन, जालिंदर दर्शने, संजय शिंदे, विजय दर्शले, विजय काटे ,बाजीराव बहिरट आणि सर्व स्पर्धक टीम तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व उपस्थितांचे नवनाथ ढवळे यांनी आभार व्यक्त केले.