शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२० जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील साधना इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संस्थापक अध्यक्षा साधना नेताजी काशीद यांच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून म्हेत्रे वस्ती,ताम्हाणे वस्ती आणि मोरे वस्ती भागात महिलांसाठी हळदी कुंकू चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे नागरिकांकडून साधना काशीद यांचे कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत परिसरातील महिलांना हळदी-कुंकू कार्यक्रमात भेटवस्तू देखील देण्यात आल्या.
Advertisement
यावेळी साधना काशीद म्हणाल्या की, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना पार्श्वभूमीवर सगळे सणासुदीचे कार्यक्रम घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या होत्या.महिलांना प्रत्येक सण साजरा करण्यासाठी बंधने घालण्यात आली मात्र आता सर्व नियमांचे पालन करून आज हळदी कुंकू चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.यावेळी नागरिकांनी देखील कोरोना चे नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे संस्थापक अध्यक्षा साधना नेताजी काशीद यांनी सांगितले.
तसेच यावेळी उपशहरप्रमुख भोसरी विधानसभा नेताजी काशीद यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.