शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२२ जानेवारी) :- स्वच्छ भारत, स्वच्छ सर्वेक्षण 2022 , स्वच्छा ग्रह, माझी वसुंधरा, प्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड शहर या विविध उपक्रमांतर्गत ओला ,सुका व घातक कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताच्या (होम कम्पोस्टिंग) प्रकल्पाचे उद्घाटन 22 जानेवारी रोजी कुटे सुख वास्तु हाऊसिंग सोसायटी वाल्हेकरवाडी येथे संपन्न झाले. समारंभ प्रसंगी नामदेव ढाके ( सत्तारूढ पक्ष नेते ) श्रीमती करुणा शेखर चिंचवडे (मा. स्थायी समिती सदस्या व मा. ‘ब’ प्रभाग अध्यक्षा,नगरसेविका) ,सचिन चिंचवडे (मा .उपमहापौर व विद्यमान नगरसेवक) अभिषेक बारणे ( ‘ ग ‘प्रभाग अध्यक्ष), तुषार कामठे (नगरसेवक पिंपळे निलख) ,एम एम शिंदे (ब प्रभाग आरोग्य अधिकारी) त्याचप्रमाणे ऑल इंडिया लोकल सेल्फ कमिटी समितीचे सदस्य – देशपांडे सर,विजय पवार, राम साठे आणि वाल्हेकरवाडी रोटरीचे सदस्य मा. श्री. गणेश बोरा ,वसंत ढवळे ,सचिन शिवलेइत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदरच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना नामदेव ढाके यांनी स्वच्छतेचे महत्व भारत देशात पिंपरी-चिंचवड स्वच्छ शहर कशाप्रकारे होत आहे आणि स्वच्छ शहर करण्यासाठी आपण सर्वांनी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याबद्दल सविस्तर माहिती देऊन सोसायटी धारकांचे अभिनंदन केले. सदरच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे सचिन चिंचवडे, अभिषेक बारणे यांनी पण सोसायटी धारकांचे कौतुक केले .
श्रीम.करुणाताई चिंचवडे यांनी कचरा वर्गीकरणात महिलांचे योगदान स्पष्ट करून सोसायटीतील महिलांना कापडी बॅग घेऊन प्लास्टिक मुक्तीचा एक संदेशही दिला. तसेच सदरच्या उपक्रमासाठी सर्व सोसायटी धारक महिलांचे विशेष अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.एम.एम. शिंदे यांनी सोसायटीचे मनोज तिडके -चेअरमन, पवार रामेश्वर-सेक्रेटरी , सर्व कमिटी सदस्य , ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग आणि फ्लॅट धारकांचे आभार मानून हा आगळा वेगळा उपक्रम सुरू केल्याबद्दल व एक आदर्श सोसायटी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.