शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०१ फेब्रुवारी) :- पिंपरी- चिंचवड महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना आज सकाळी मंगळवारी (दि.1) जाहीर करण्यात आली. तळवडे येथून प्रभागाला सुरुवात होणार असून शेवटचा प्रभाग सांगवी असेल. 139 नगरसेवक संख्येसाठी तीन सदस्यांचे 45 तर चार सदस्यांचा एक प्रभाग सांगवीचा आहे. प्रभागाची किमान लोकसंख्या 32 हजार तर कमाल लोकसंख्या 40 हजार आहे. अनुसूचित जातीसाठी 22 तर अनुसूचित जमातीसाठी 3 जागा राखीव आहेत. 114 जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत.
महापालिकेच्या नगरसेवक संख्येत 11 ने वाढली आहे. पूर्वी 128 होती ती आता 139 झाली आहे. या प्रभाग रचनेकडे नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. नवा प्रभाग कसा असेल, त्याला कोणता भाग जोडला असले, कोणता भाग वगळला असेल याबाबत कमालीची उत्कंठा आहे. महापालिकेची सन २०१७ मधील निवडणूक चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने झाली. सध्या शहरात ३२ प्रभाग आहेत.
आता तीनसदस्यीय पद्धतीनुसार ४६ प्रभाग होतील. त्यातील ४५ प्रभाग तीन नगरेसवकांचे तर एक प्रभाग चार नगरसेवकांचा असेल. प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करताना प्रगणक गट, प्रभाग दर्शविणाऱ्या खुणा निश्चित केल्या जाणार आहेत. हा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर त्यामध्ये ५० वेळा सुधारणा करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी (एससी) 16टक्के आरक्षण आहे. त्यामुळे 139 सदस्यांच्या महापालिका सभागृहात 22 सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या 11असेल. दरम्यान , पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही गांधीनगर, खराळवाडी, मोरवाडी, ज्ञानेश्वर नगर, एम्पायर इस्टेट, अजमेरा काॅलनी, विशाल थिएटर या प्रभाग रचनेत आली असून त्यांची एकून लोकसंख्या 38244 आहे.
प्रभाग क्रमांक १ – तळवडे गावठाण ,एम आय डी सी ,आयटीपार्क ,ज्योतिबा मंदिर परिसर, सह्योग नगर, रुपीनगर ,त्रिवेणी नगर लोकसंख्या – ४०७६७
प्रभाग क्रमांक २ – चिखली गावठाण भाग ,पाटील नगर, गणेश नगर ,मोरे वस्ती ,सोनवणे वस्ती, कुदळवाडी लोकसंख्या – 36 हजार ६५३
प्रभाग क्रमांक ३ – बोराडे वाडी, रिव्हर रेसिडेन्सी, क्रिस्टल सिटी ,स्वराज रेसिडेन्सी ,वुड्स विलाह, जाधव वाडी लोकसंख्या – 37 हजार ६७१
प्रभाग क्रमांक ४ – मोशी गावठाण, गंधर्व नगरी, आदर्श नगर, डुडुळगाव ,नागेश्वर नगर ,सद्गुरू नगर, लोकसंख्या – ३९ हजार ६४६
प्रभाग क्रमांक ५ – चऱ्होली , चोविसावाडी, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारे मळा, बोराडे वस्ती, ताजने मळा लोकसंख्या – ३९ हजार ९७०
प्रभाग क्रमांक ६ -दिघी, समर्थ नगर, गणेश नगर, बोपखेल गावठाण लोकसंख्या – ४०,६४६
प्रभाग क्रमांक ७ – सॅंडविक कॉलनी , राम नगर, तुकाराम नगर लोकसंख्या – ३७०९७
प्रभाग क्रमांक ८ – भोसरी गावठाण ,गवळीनगर ,खंडोबा माळ ,शीतल बाग लोकसंख्या – ३९ हजार २१९
प्रभाग क्रमांक ९ – धावडे वस्ती, चक्रपाणी वसाहत लोकसंख्या – ४० हजार १८
प्रभाग क्रमांक १० – इंद्रायणी नगर, लांडेवाडी, महाराष्ट्र कॉलनी, शांतीनगर ,गव्हाणेवस्ती लोकसंख्या – ३९८०२
प्रभाग क्रमांक ११ – गवळीमाता, बालाजीनगर लोकसंख्या – ३७ हजार ३६०
प्रभाग क्रमांक १२ – घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती लोकसंख्या ३४ हजार ४१८
प्रभाग क्रमांक १३ – मोरे वस्ती, मेहेत्रे वस्ती लोकसंख्या – ३९१४९
प्रभाग क्रमांक १४ – यमुना नगर , फुलेनगर लोकसंख्या – ३५७११
प्रभाग क्रमांक १५ – संभाजीनगर ,बर्ड व्हॅली, वृंदावन सोसायटी ,पूर्णा नगर, शाहू नगर, आरटीओ लोकसंख्या – ३५२०९
प्रभाग क्रमांक १६ – नेहरूनगर, अंतरिक्ष सोसायटी ,विठ्ठल नगर, नगर स्टेडियम ,टाटा मोटर्स ,अमृतेश्वर कॉलनी, यशवंतनगर लोकसंख्या – ३५४२४
प्रभाग क्रमांक – १७ – वल्लभ नगर,एच . ए ,कॉलनी, वायसीएम ,संत तुकाराम नगर, महेश नगर ,महात्मा फुले नगर लोकसंख्या – ३४१५०
प्रभाग क्रमांक १८ – मनपा भवन, मोरवाडी, ज्ञानेश्वर नगर, एम्पायर स्टेट ,अजमेरा कॉलनी, विशाल थियेटर गांधीनगर, खराळवाडी लोकसंख्या – ३८२४४
प्रभाग क्रमांक १९ – चिंचवड स्टेशन ,दत्त नगर, मोहन नगर ,इंदिरा नगर, आनंद नगर, एमआयडीसी कार्यालय लोकसंख्या – ३३९१६
प्रभाग क्रमांक २० – काळभोर नगर, बजाज कंपनी, थरमॅक्स कंपनी, खंडोबा मंदिर, रामनगर, विद्या नगर, दत्तनगर, अजंठा नगर लोकसंख्या – ३६५८८
प्रभाग क्रमांक २१ – आकुर्डी, गावठाण, गंगानगर, दत्तवाडी, लोकमान्य हॉस्पिटल, परिसर लोकसंख्या – ४००८५
प्रभाग क्रमांक २२ – ओटा स्कीम, निगडी गावठाण ,साईनाथ नगर ,सिद्धार्थ नगर लोकसंख्या – ३७७३८
प्रभाग क्रमांक 23 – वाहतूकनगरी, भक्ती-शक्ती, केंद्रीय वसाहत लोकसंख्या – ३६९४७
प्रभाग क्रमांक 24 – मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत लोकसंख्या – ३८७७९
प्रभाग क्रमांक 25 – वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा, शिंदेवस्ती लोकसंख्या – ३९५३१
प्रभाग क्रमांक 26 – बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, चिंचवडेनगर लोकसंख्या – ३७४२०
प्रभाग क्रमांक 27 – चिंचवडगाव, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह लोकसंख्या – ३८७२७
प्रभाग क्रमांक 28 – केशवनगर, यशोपुरम, श्रीधरनगर लोकसंख्या – ३९७५३
प्रभाग क्रमांक 29 – भाटनगर, मिलिंदनगर, पिंपरी कॅम्प, जिजामाता हॉस्पिटल लोकसंख्या – – ३९०३६
प्रभाग क्रमांक 30 – पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैभवनगर लोकसंख्या – ३८९०६
प्रभाग क्रमांक 31 – काळेवाडी, विजयनगर, नढेनगर लोकसंख्या – – ३९०६८
प्रभाग क्रमांक 32 – तापकीरनगर, रहाटणी, ज्योतिबानगर लोकसंख्या – – ३३५८४
प्रभाग क्रमांक 33 – रहाटणी, रामनगर, शिवतिर्थनगर लोकसंख्या – ३७५९१
प्रभाग क्रमांक 34 – बापुजीबुवानगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अशोका सोसायटी लोकसंख्या – ३४०८५
प्रभाग क्रमांक 35 – थेरगाव, बेलठिकानगर, पवारनगर लोकसंख्या – ३४९५७
प्रभाग क्रमांक 36 – गणेशनगर, संतोषनगर, पद्मजी पेपर मिल लोकसंख्या – ३६०८९
प्रभाग क्रमांक 37 – ताथवडे, पुनावळे, काळाखडक लोकसंख्या – – ३२६६४
प्रभाग क्रमांक 38 – वाकड, भुमकरवस्ती, कस्पटेवस्टी, वाकडकर वस्ती लोकसंख्या – ३४८७३
प्रभाग क्रमांक 39 – पिंपळेनिलख, विशालनगर, वेणुनगर, पोलीस लाईन, कावेरीनगर लोकसंख्या – ३९६५२
प्रभाग क्रमांक 40 – पिंपळेसौदागर, कुणाल ऑयकॉन, प्लॅनेट मिलेनियम लोकसंख्या – ३७९२०
प्रभाग क्रमांक 41 – पिंपळेगुरव गावठाण, जवळकरनगर, वैदुवस्ती लोकसंख्या – ३४०७१
प्रभाग क्रमांक 42 – कासारवाडी, फुगेवाडी, कुंदननगर, वल्लभनगर लोकसंख्या – ३६७५४
प्रभाग क्रमांक 43 – दापोडी, गणेशनगर, महात्मा फुलेनगर लोकसंख्या – – ३९२६६
प्रभाग क्रमांक 44 – पिंपळेगुरव, काशिदनगर, मोरया पार्क लोकसंख्या – – ४००३२
प्रभाग क्रमांक 45 – नवी सांगवी, किर्तीनगर, विनायकनगर, गजानन महाराज नगर लोकसंख्या – ३४५२७
प्रभाग क्रमांक 46 – जुनी सांगवी, ममतानगर, जयमालानगर, शितोळेनगर लोकसंख्या – ४६९७९
लोकसंख्या (2011) : 17 लाख 27 हजार 692
अनुसूचित जातीची लोकसंख्या : 2 लाख 73 हजार 810 (15.84टक्के)
अनुसूचित जातीसाठी आरक्षण 16 टक्के : एकूण 22 जागा (पैकी 11 महिला)
अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभाग : 29, 19, 20, 22, 43, 11, 37, 18, 29, 34, 16, 35, 17, 44, 39, 32, 46, 41, 14, 25, 38, 33
अनुसूचित जमातीची लोकसंख्या : 36 हजार 535 (2.11 टक्के)
अनुसूचित जमातीसाठी आरक्षण 3 टक्के : 3 जागा (पैकी 2 महिला)
अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रभाग : 41, 5 आणि 6
सर्वसाधारण प्रभाग : 114 (पैकी 57 महिला)
एकूण नगरसेवक संख्या : 139