महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला विश्वास
शबनम न्यूज : पुणे (दि.०२ फेब्रुवारी) :- विविध नव्या प्रकल्पांचीही मुहूर्तमेढ रोवली जात आहे. पुणे शहराला जागतिक पातळीवर अधोरेखित करताना देशपातळीवरही विविध पुरस्कारांनी पुण्याच्या शाश्वत विकासकामांवर शिक्कामोर्तब झाले. सुज्ञ पुणेकर या सर्व बाबींचा विचार करुन भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहतील, असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदानरुपी साथ मतदार देतील हा विश्वास आहे. पुण्याच्या भविष्याचा वेध घेताना विविध महत्त्वाचे प्रकल्प गेल्या पाच वर्षात पूर्णत्वास नेले. मेट्रो आणि समान पाणीपुरवठा प्रकल्पही पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहेत.प्रभागांची मोडतोड करुन आणि निकष डावलून नवे प्रभाग करुन भारतीय जनता पक्षाला रोखता येईल, असे विरोधकांना वाटत असले तरी त्यांच्या भ्रमाचा भोपळा पुणेकरच फोडतील. गेल्या पाच वर्षांत पुणेकरांना केंद्रबिंदू ठेवूनच भारतीय जनता पक्षाने महापालिकेचा कारभार केलेला आहे. असेही मत महापौर मोहोळ यांनी व्यक्त केले.