निगडी : यमुनानगर, साईनाथ नगर, परिसरात मोकाट जनावरांची गंभीर समस्या झाली आहे. मोकाट जनावरांच्या विष्ठेची दुर्गंधी यमुना नगर , साईनाथ नगर परिसरात पसरत आहे. मोकाट जनावरांच्या विष्ठे वरून सायकल, मोटरसायकल घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
महानगरपालिकेन मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रसाद कोलते यांनी केली.
मोकाट जनावरांमध्ये गाय,बैल,वासरांचा समावेश आहे. ही जनावरे रस्त्याच्या मधोमध व अस्ताव्यस्त बसतात वाहन चालकाने हॉर्न वाजवला तरी ही जनावरे हलत नाहीत. लहान वासरे रस्त्यामध्ये बसल्यावर मोठ्या गाड्या चालकांना दिसत नाही. त्यामुळे अपघात वासरांचा गंभीर जखमी होऊन त्यामध्ये त्यांचा मृत्यू पण होतो आशा काही घटना काही दिवसा पुर्वी घडल्या आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघाताला सामोरे जावे लागत आहे.
मोकाट जनावरांचा सर्वाधिक त्रास यमुनानगर रस्ता व साईनाथ नगर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना होत आहे .या मोकाट जनावरांनी नागरिकांना हैराण करून सोडले आहे. रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहन चालकांना वाहन चालवणे कठीण होत आहे. महानगरपालिकेने मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी प्रसाद कोलते यांनी केली