शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात आज व उद्या संपूर्ण लॉक डाऊन जाहीर करण्यात आला त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व व्यापारी ,नागरिक यांनी या बंद ला उत्तम प्रतिसाद दिला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार आज पिंपरी-चिंचवड शहरात नवीन कोरोना बाधित २२३९ इतके रुग्ण आढळले असून आज २२६१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १ लाख ६५ हजार ३६७ इतकी झाली असून एकूण कोरोना मुक्त एक लाख २६ हजार ९२४ झाले आहेत आज दिवसभरात कोरोना मुळे २८ जणांचा मृत्यू झाला असून आज पर्यंत तीन हजार ३२ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोरोना बाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अ प्रभाग (२४५ बाधित)
निवडणूक प्रभाग क्रमांक
10, 14, 15, 19
ब प्रभाग (३४७ बाधित)
निवडणूक प्रभाग क्रमांक
16, 17, 18, 22
क प्रभाग (२७५ बाधित)
निवडणूक प्रभाग क्रमांक
2, 6, 8, 9
ड प्रभाग (३७४ बाधित)
निवडणूक प्रभाग क्रमांक
25, 26, 28, 29
इ प्रभाग (२६१ बाधित)
निवडणूक प्रभाग क्रमांक
3, 4, 5, 7
फ प्रभाग (२६३ बाधित)
निवडणूक प्रभाग क्रमांक
1, 11, 12, 13
ग प्रभाग (२४७ बाधित)
निवडणूक प्रभाग क्रमांक
21, 23, 24, 27
ह प्रभाग (२२७ बाधित)
निवडणूक प्रभाग क्रमांक
20, 30, 31, 32