शबनम न्यूज : पुणे (दि.२८ फेब्रुवारी) :- महानगरपालिका निवडणूक 2022 या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती रामविलास पार्टीच्या वतीने निवडणूक आढावा बैठक घेण्यात आली. 27 फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी ही बैठक झाली.
बैठकीस महाराष्ट्र प्रदेश सचिव अमर पुणेकर, पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट ,शिरूर तालुका अध्यक्ष शरद टेमगिरे, वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ अध्यक्ष संतोष पिल्ले, हडपसर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष राहुल उभे ,उपाध्यक्ष संजय चव्हाण ,हडपसर विधानसभा मतदारसंघ महिला अध्यक्ष योगिता साळवे ,शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष रणजीत सोनावळे, पर्वती विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष दयानंद नाईक नवरे ,पुणे शहर सरचिटणीस सचिन अहिरे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस के सी पवार ,हवेली तालुका अध्यक्ष प्रमोद राजगुरू, वडगाव शेरी सरचिटणीस जीवन शिंदे, उपाध्यक्ष सतीश सोनवणे ,श्याम पासी ,राजेश पिवाल, किरण नेटके, नरेश सोनवणे, बंडू वाघमारे, कुसुम दहीरे, इमरान खान इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .
महानगरपालिकेत लोकजनशक्ती पार्टी रामविलास संपूर्ण ताकतीने निवडणुकीत सामोरे जाणार असल्याचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट यांनी सांगितले .लवकरच पुणे महानगरपालिकेतील निवडणुकीसाठी लोक जनशक्ती पार्टी रामविलास सर्व उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.