शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ मार्च) :- घरकुल चिखली येथे ब्लॉक काॅक्रेंटीकरण व फुटपाथ दुरुस्ती करण्याबाबतचे निवेदन माजी प्रभाग सदस्य दिनेश यादव यांनी सहाय्यक आयुक्त, झो.नु.पु , पिंपरी चिंचवड मनपा यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे कि, कित्येक महिन्यांपासून घरकुल चिखली येथे दुर्वांकुर हौ.सौ. बिल्डिंग नं. एफ 20 या ठिकाणी साप, उंदीर, घूस व इतर विषारी प्राण्यांपासून होणाऱ्या त्रासाबाबत तेथे राहणाऱ्या लोकांच्या तक्रारी दिनेश यादव यांच्या कडे येत होत्या, त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून ब्लॉक काॅक्रेंटीकरण, रस्ता दुरुस्ती, सिमेंट कॉक्रेटिकरण लवकरात लवकर करण्यात यावे, जेणे करून लोकांना होणारा त्रास कमी होईल. असं ही त्यांनी म्हंटल आहे.
यावेळी दुर्वांकुर हौ. सौ. चेअरमन दत्तात्रय चोरमले , कुमार होले उपस्थित होते.
Advertisement