पुणे : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी नुकतीच आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२२ प्रसिद्ध झाली आहे या यादीमध्ये पुण्याच्या नेहा नारखेडे या तरुण उद्योजिका च्या नावाचा समावेश आहे नेहा या मूळच्या पुण्यातील असून त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे पुण्यातच झाले आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी कॉलेज एससीटीआर मधून अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर त्या जॉर्जिया येथे कॉम्प्युटर सायन्स मध्ये पदवीधर पदवी घेण्यासाठी गेल्या त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नेहा नारखेडे यांनी ओरॅकल आणि लिंकिंग येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कामाला सुरुवात केली व आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी 2014 मध्ये कॉन्फ्लुएंट या कंपनीची स्थापना केली नेहा या ३७ वर्षाचे असून इतक्या लहान वयात श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविणाऱ्या त्या कदाचित पहिल्याच भारतीय महिला उद्योजक आहेत
previous post