शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०१ एप्रिल) :- नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डी संचलित श्री सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर आकुर्डी पुणे 35 या शाळेत ” गुढीपाडवा शुभेच्छा समारंभ ” मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक मा. श्री. गोविंदराव दाभाडे सर हे उपस्थित होते तसेच सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजू माळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
” इंग्रजी वर्षाची सुरुवात आपण ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे मोठ्या उत्साहात मराठी नूतन वर्षाच्या सुरुवात व्हावी ” अशी भावना मुख्याध्यापक श्री. राजू माळे सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सुनंदा कदम , स्वागतगीत कु. युगंधरा पाटील यांनी सादर केल. तसेच शिक्षक मनोगत सौ. सुहासिनी वैद्य यांनी केले तर आभार श्री. योगेश पाटील सर यांनी व्यक्त केलेे. अशा प्रकारे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.