शबनम न्यूज : पुणे (दि.१६ एप्रिल) :- दोन वर्षांच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर ईस्ट स्ट्रीट कॅम्प मधील मेथडिस्ट मराठी चर्चच्या वतीने यावर्षी ‘गुड फ्रायडे ‘ निमित्त १५ एप्रिल रोजी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले .
या दिवशी ‘उत्तम शुक्रवार भक्ती’उपक्रम दुपारी साडे बारा पासून सुरु करण्यात आला.सुशील सोनावणे यांनी संचलन केले.विविध विषयांवर एड.मार्कस देशमुख(हे बापा,त्यांना क्षमा कर,कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही),रेव्हरंड चंद्रशेखर जाधव(मी तुला खचित सांगतो,तू आज मजबरोबर सुखलोकात असशील),आशा सिंग(बाई,पाहा ही तुझी आई!),रेव्हरंड चंद्रशेखर जाधव(माझ्या देवा ,तू माझा त्याग का केलास ),स्टॅनली मूर्ती (मला तहान लागली आहे),शिरीष गायकवाड(पूर्ण झाले आहे ),रेव्हरंड चंद्रशेखर जाधव (हे बापा,मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो) यांनी मार्गदर्शन केले.२ मार्च ते १७ एप्रिल दरम्यान मेथडिस्ट मराठी चर्चच्या वतीने ‘लेंट समयातील’उपक्रम सुरु असून गुड फ्रायडेचे कार्यक्रम हा त्यातील एक भाग होता. सर्वांसाठी मुक्त प्रवेश होता.