शबनम न्यूज : पुणे (दि.१९ एप्रिल) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलताना दोन मोठ्या घोषणा केल्या होत्या.”५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे आणि महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहे.” असं ते म्हणाले होते.हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेचे राज ठाकरे यांनी वेळोवेळी भाजप वर टीका केली तसेच या टिके दरम्यानच या पूर्वी एके काळी राज ठाकरे यांनी व्यंगचित्रही काढले ही’ काढलेले व्यंगचित्र आज पुण्यामध्ये झळकत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तसेच राम मंदिराला विरोध करून व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे यांना शेवटी अयोध्येलाच जावे लागणार आहे. या आशयाचे फ्लेक्स तसेच सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदुत्व असे वक्तव्य करणारे राज ठाकरे विरोधात आज पुण्यामध्ये झळकलेली पहावयास मिळाले. पुणेकरांनी लावलेले हे फ्लेक्स राज ठाकरे यांना त्यांच्याच रेखाटलेल्या व्यंगचित्राची आठवण करुन देणारे आहे.
पुण्यातील अलका टॅाल्कीज चौक , गुडलक चौक तसेच कोथरुड येथील करिष्मा चौक येथे हे निनावी होर्डिंग्ज दिसुन आले आहेत .
तसेच मागील काही दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी 2019 मध्ये केलेल्या भाषणाची क्लिप वायरल झाली आहे या क्लिपमध्ये राज ठाकरे यांनी भविष्यकाळात जातीय वादातून दंगल घडविण्याचे काम होणार असल्याचे सांगितले होते आणि आता मशिदीवरील भोंगे विषयी व अनेक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले तसेच आता राज ठाकरे हे आता 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच एक मे रोजी औरंगाबाद मध्ये ही सभा घेणार आहेत तसेच मशिदी वरील भोंगे काढण्यासाठी ०३ मे पर्यंत त्यांनी राज्यशासनाला अल्टिमेटम दिले आहे. या सर्व घटनांचा निषेध करणारे फ्लेक्स पुण्यामध्ये लावण्यात आले आहे.