शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ एप्रिल) :- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून, स्वच्छेदन करणारा मजूर, रस्त्यावर बसून काम करणारा चर्मकार, चहा टपरी चालक तसेच कार्यक्षम गुणवंत कामगार यांना दरवर्षी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या माध्यमातून वंचित घटकाकडे लक्ष देऊन दरवर्षी गौरवण्यात येते.
कंपनीचा कामगार कधी फाटकाच्या आत तर कधी फाटकाच्या बाहेर अशी दयनीय अवस्था कामगाराची झाली आहे, नारायण सुर्वेच्या भाषेत सांगायचे झाले तर कामगार आहे मी ,तर तळपती तलवार आहे. परंतु हे आता कागदोपत्रीच राहिलेले आहे ,अनेक बंधने कामगारावर आले आहेत.
या सर्वांचा विचार करून अनेक वंचित घटकांना पुरस्कार रुपी न्याय देण्याचा या संस्थानी प्रयत्न केला आहे. औद्योगिक विकास परिषद, लायन्स क्लब भोजपुरी गोल्ड , दिलासा संस्था यांनी आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र कामगार राज्यमंत्री बच्चू कडू , व 89 व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व जेष्ट साहित्यिक श्रीपाल सबनीस ,
,महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेचे अध्यक्ष सुदाम मोरे ,कार्याध्यक्ष ,कामगार भूषण पुरुषोत्तम सदाफुले, लायन लायन्स क्लबच्या अध्यक्षां डॉक्टर सुरेखा साबळे, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक,महाराष्ट्र भूषण काशिनाथ नखाते सह डायऩोमर्क कंट्रोलसचे मनुष्यबळ विभाग प्रमुख सूर्यकांत मुळे इत्यादी मान्यवर राहणार आहेत.
हा कार्यक्रम शुक्रवारी दिनांक 29 रोजी अँटो क्लस्टर येथे सकाळी 10.30 होणार आहे.