पुणे :
कुठलेही व्यक्तिमत्व जे खुलते ते बाह्यांग कसे आहे यामुळे ठरत नाही तर अंतरंग चांगले असेल
तर ते व्यक्तिमत्व निश्चितच खुलते.
व्यक्तिमत्व यशस्वी,प्रभावी, घडण्यासाठी
अंतर्मनाचा विकास घडवण्यासाठी सातत्याने उच्च
आदर्शवादाचे आचरण करीत रहाणे हे आवश्यक असते. “
असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तिचे कलावंत आणि फोटो वर्ल्ड संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी प्रतिपादन केले.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदीप्यमान कामगिरी करणा-या
8 यशस्वितांना नुकताच 2022चा इंटरनॅशनल सेल्फी ॲवाॅर्ड ऑनलाईन प्रदान करण्यात आला.याप्रसंगी डाॅ.मधुसूदन घाणेकर बोलत होते. वर्ल्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष-प्रा.नागेश हुलावळे,नेदरलॅंडसच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कवयित्री डाॅ.मानसी मोहरिल,
आंतरराष्ट्रीय पातळीवर पत्रकारिता करणा-या ॲड.प्रणिता देशपांडे-नेदरलॅंडस , भारत
बेल्जियम मैत्रीसंघाच्या अध्यक्ष
प्रिती दबडे,हायकू इंटरनॅशनलच्या अध्यक्ष योगिता
पाखले, काव्यसखी काव्यमंच संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष
प्रतिमा काळे, अक्षरआनंद
इंटरनॅशनलचे संस्थापक-अध्यक्ष
डाॅ.योगेश जोशी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लघुपटासाठी उच्च प्रतिचे यश संपादन करणा-या जयश्री शेंडे यांना इंटरनॅशनल सेल्फी ॲवाॅर्ड
प्रदान करण्यात आला.