शबनम न्युज | पुणे
पुण्यात रविवारी (दि. ११) सायंकाळी झालेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. यामध्ये निगडी बस डेपोची वीज रात्री नऊ वाजता खंडित झाली. निगडी डेपोचा वीज पुरवठा खंडित झाल्याने सुमारे ७० ई – बस डेपोतच थांबून होत्या. यामुळे सुमारे चारशे हुन अधिक ई-बस फेऱ्या रद्द झाल्याने वीस ते बावीस हजार प्रवाशांना फटका बसला. तसेच पीएमपीचे तीन ते चार लाखांचे आर्थिक नुकसान झाले.
याशिवाय बस न धावल्याने पीएमपी ठेकेदारांना एक दिवसाचे भाडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे देखील पीएमपीची आर्थिक नुकसान वाढणार आहे. रात्रभर वीज नसल्याने निगडी डेपोची एकही बस सकाळच्या सत्रात धावली नाही, दुपारच्या सत्रात वीज आली. तसेच अन्य काही डेपोंच्या बसची जमवाजमव करून ३७ बस धावल्या, दुसऱ्या सत्रातही ३३ बस धावल्या नाहीत. त्यामुळे पीएमपीचे सुमारे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले.