शबनम न्युज | पुणे
ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कला व संस्कृती विशेष उद्दिष्ट गटातर्फे शनिवारी ‘कला मेळावा ‘ आयोजित करण्यात आला आहे. हा वार्षिक मेळावा शनिवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता ज्ञान प्रबोधिनी उपासना मंदिर , सदाशिव पेठ येथे होणार आहे.मिलिंद संत,डॉ. समीर दुबळे,शिवाली वायचळ,डॉ. वैदेही केळकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
विविध कला माध्यमांमधून वैयक्तिक व सामाजिक स्वास्थ्य तसेच आनंद निर्मिती साठी कार्यरत असलेल्या या गटातर्फे आयोजित या मेळाव्यामधे गतवर्षीच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला जाणार आहे. आगामी वर्षात नियोजित असलेल्या उपक्रम व कार्यशाळांसंबंधी माहिती देण्यात येणार आहे. यामधे संगीत रसास्वाद, सर्वांसाठी आवाज साधना, चित्रकला तंत्र प्रशिक्षण, नाट्य प्रशिक्षण, लोकनृत्य प्रशिक्षण इत्यादी आगामी कार्यशाळांची सविस्तर माहिती देण्यात येईल.विविध कार्यशाळांसाठी नावनोंदणी ची व्यवस्था मेळाव्याच्या ठिकाणी करण्यात आली आहे. हा मेळावा रसिक व आस्वादक सर्वांसाठी खुला आहे.