शबनम न्युज | पिंपरी
ज्येष्ठ समाजसेवक व थोर उद्योजक कै. गणपत रामचंद्र कोलते यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण निमित्त दिनांक ०५ जून रोजी सुश्राव्य कीर्तन सोहळा संपन्न झाला.अमृता विद्यालय यमुना नगर निगडी येथे युवा नेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष प्रसाद दादा कोलते यांनी या कीर्तनाचे आयोजन केले होते.
कीर्तनकार पुनमताई जाचक (कोलते) यांच्या सुमधुर वाणीने नागरिकांना मंत्रमुग्ध केले. अध्यात्मातील विविध दाखले देत समाजप्रबोधनाचे समर्पक कार्य या कीर्तन सोहळ्यातून साध्य झाल्याचे दिसून येते. तसेच प्रभागातील अभिषेक सोनार यांनी कीर्तनकार पूनमताई जाचक (कोलते) यांच्या हस्ते वारकरी संप्रदायातील पवित्र तुळशी माळ परिधान केली.
५ जून हा जागतिक पर्यावरण दिन असल्याने तो अध्यात्मिक पद्धतीने साजरा करण्यात आला.वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संदेश देत, जवळपास ५० हुन अधिक विविध वृक्षांच्या रोपांचे रोपन परिसरात करण्यात आले. तसेच हिंदू धर्मियांमध्ये अतिशय मंगलमय असणाऱ्या आणि प्रत्येकाच्या घराच्या अंगणात असणारी तुळशीच्या ५०० हुन अधिक रोपांचे वाटप प्रभागातील नागरीकांना करण्यात आले. आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
अध्यात्म आणि आधुनिकता यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत प्रसाद कोलते यांनी अतिशय चांगला संदेश सदरील कार्यक्रमातून दिल्याचे दिसून येते. सदरील कार्यक्रमामध्ये संजोग भाऊ वाघेरे (मा. शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड), विशाल वाकडकर (उपाध्यक्ष: राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश), विशाल काळभोर (सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश, प्रभारी पुणे), मयूर जाधव (उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड), प्रतीक साळुंखे (सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड), अक्षय माछरे , यश दत्ताकाका साने (अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवड),बाळासाहेब काशिद (भंडार डोंगर समिती अध्य्क्ष),मा.नगरसेवक विक्रांत लांडे,सचिन चिखले, सुमनताई पवळे, कमलताई घोलप ,शुभांगीताई बोराडे,सुलभाताई उबाळे, शशिकीरण गवळी, तानाजी खाडे,सचिन सानप, दत्ता नाना पवळे,संजय बोऱ्हाडे,सतीश दरेकर, शितल पवार,संतोष कवडे,राजु खाडे,भानदास कोलते,संपत दादा चौधरी,अजिंक्य कांचन, अक्षय सरोदे तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.