राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या महिला शहरअध्यक्षा गंगा ताई धेंडे यांचे आयोजन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१८ डिसेंबर) :- भिमाकोरेगाव विजयस्तंभ स्मारकासाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते मा. राहुल डंबाळे यांचा सत्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मा. संजोगजी वाघेरे व कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. कैलासभाऊ कदम यांचे हस्ते करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहरअध्यक्षा सौ.गंगाताई संजय धेंडे यांच्या वतीने आयोजन करण्यात आला.
घरोंदा हाॅटेल येथे पत्रकार परिषद घेण्यात आली त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारचे व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचे आभार मानण्यात आले व भिमाकोरेगाव विजयस्तंभासाठी सरकारने योग्य पाऊल उचलले त्या बद्दल पेढे वाटुन आनंद साजरा केला.
या प्रसंगी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या नेत्या मा. सुवर्णाताई डंबाळे , राष्ट्रवादीचे प्रवक्ते मा. फजल शेख , रिपब्लिकन युवा मोर्चाच्या मेघा आठवले , विलास ससाणे,रुपेश धेंडे,सारीकाताई पवार,कविताताई खराडे,आशाताई शिंदे, मनिषा ताई गटकळ,मेघाताई पळशिकर,भव्यशिला गायकवाड,अभय,बबन ससाणे ,कामगार नेते मा. शिवशंकर उबाळे, गोपाळ मोरे , माऊली बोराटे,अभिजीत कांबळे, सिकंदर सुर्यवंशी,सुजाताताई शिंदे आदि मान्यवर उपस्थितीत होते.
काम करणारा कार्यकर्त्यांचा मनमोकळेपणाने सत्कार व यथोचित सन्मान केलाच पाहिजे तेव्हा कार्यकर्त्या ला अजुन प्रोत्साहन मिळते असे सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर महिला अध्यक्षा सौ गंगाताई संजय धेंडे म्हणाल्या.