पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष शाम भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव परिसरातील महिला भगिनी साठी सिनेअभिनेते क्रांती नाना मळेगावकर व सह्याद्री क्रांती नाना मळेगावकर यांचा गप्पा गोष्टी रंजक खेळ सोबतचा कॉमेडीचा बहारदार कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा हा येत्या गुरुवारी 26 मे रोजी सायंकाळी सहा वाजता सृष्टी चौक, गार्डन मैदान, पिंपळे गुरव, पुणे येथे शामभाऊ जगताप मित्र परिवार वतीनेआयोजित करण्यात आला आहे.
या न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांतुन भाग्यवान महिलेस मानाची पैठणी देण्यात येणार आहे या कार्यक्रमात प्रथम बक्षीस एलसीडी टीव्ही, व्दितीय क्रमांक फ्रीज, तृतीय क्रमांक आटा चक्की, चतुर्थ क्रमांक वॉशिंग मशीन तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस कूलर असणार आहे. तसेच सायकल, मोबाईल, मायक्रोव्हान , शिलाई मशीन ,एक्वागार्ड, गॅस शेगडी ,होम थेटर, इलेक्ट्रिक गिझर, मिक्सर ,टेबल फॅन ,स्मार्ट वॉच, मेकअप बॉक्स ,स्टील भांडे असे लकी ड्रॉ स्पेशल बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे शामभाऊ जगताप जनसंपर्क कार्यालय, भीमाशंकर कॉलनी, रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, पिंपळे गुरव तसेच तानाजी जवळकर जनसंपर्क कार्यालय, जवळकर नगर, पिंपळे गुरव या ठिकाणी इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शामभाऊ जगताप व सामाजिक कार्यकर्त्या सौ अश्विनी शामभाऊ जगताप यांनी केले आहे.