शबनम न्युज | पिंपरी
आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना, या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील स्वर्गीय दत्ता काका साने पेट्रोलियम तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सन्मान करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नगरसेवक स्व. दत्ता काका साने यांनी जो सामाजिक कार्याचा वसा घेतला होता. तोच वसा त्यांची कुटुंबीय पुढे चालवत आहेत. सामाजिक कार्याचे जे रोप स्वर्गीय दत्ता काका साने यांनी रोवले होते, त्या रोपाचे वटवृक्ष करण्याची जबाबदारी त्यांची कुटुंबीय चालवत आहेत. स्व. दत्ता काका साने यांचे स्मरण सर्वच मान्यवरांनी यावेळी केले. तसेच त्यांनी केलेले कार्य हे शहरातील नागरिक किंवा या कार्यक्रमातील उपस्थित असलेले व्यक्ती कधीही विसरू शकणार नाही दत्ता काका साने पेट्रोलियमची स्थापना ही त्यांनीच केली. या स्वतंत्र दिनी मान्यवरांचा सन्मान करत असताना स्व. दत्ता काका साने यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या सन्मान सोहळ्यात पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पत्रकार, महानगरपालिकेतील सफाई कामगार तसेच कोविड काळात अत्यंत जबाबदारीने कर्तव्य करीत असलेले नागरिक तसेच कोविड काळात स्व. दत्ता काका साने यांनी केलेल्या कार्याची आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी इंडियन ऑईलचे डीजीएम नितीन विशिष्ट साहेब, सेल्स ऑफिसर शंकर सर, चिखलीचे माजी उपसरपंच यशवंतराव साने, माजी सरपंच गणपत आहेर, बाळासाहेबजंगल साने,विणेकरी.बाळासाहेब सोपान साने,विकास सोसायटी व्हाॅ.चेअरमन.बाळासाहेब राघू साने,,विकास सोसायटी सदस्य.कांतिलाल साने,दत्तोबा म्हेत्रे,तुकाराम ज्ञानोबा नेवाळे,लक्ष्मण यादव ,चांगदेव मोरे,लक्ष्मण मोरे,रमेश मोरे,सुदर्शन मोरे,भाऊसाहेब गोरे,सुरेश गायकवाड साहेब,तात्या गरड,तात्या उद्गाते,गोवर्धन खंडागळे,नाना मासाळ,राम साने,मारूती साने,भाऊसाहेब गोरे,हिदूराव गायकवाड, कांबळे,अर्जुन सोनवणे,खंडू भोसले,रा.काॅ.शहराध्यक्ष.यश दत्ता काका साने,युवा नेते.विकास साने,युवा नेते पांडुरंग साने,विठ्ठल मोरे,अभिजित साने,दिगंबर साने,अविनाश साने,शुभम साने,सुमित पाटिल,वैभव खंडागळे,चेतन घनवट,प्रशांत वाजले, शांतीलाल मेहेर, भूमेश पवार, आनंद काकडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सर्वांचे आभार दत्ता काका साने आणि प्रतिष्ठान वतीने व्यक्त करण्यात आले.