शबनम न्युज | पिंपरी
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने ‘ क ‘ कॅलिग्राफी यांच्या संकल्पनेतून व शशिकला फाउंडेशन(USA) यांच्या सहकार्याने आयोजित “माझी माती माझा गणपती” शाडुच्या मातीपासुन गणपती बनवणे ही कार्यशाळा कै:शिवाजी भोईर सांस्कृतिक हॉल चिंचवड येथे रविवार २१ ऑगस्ट रोजी पार पडली.
या कार्यशाळेत लहान मुले, युवा वर्ग, अपंग व सोबत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अशा या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्वांसाठी हा एक वेगळाच आनंदी अनुभव होता.
मधुकर बच्चे यांच्या माध्यमातून चिंचवड प्रभागातील सर्व वयोगटातील लोकांसाठी गेल्या ५ वर्षापूर्वी या उपक्रमाची सुरवात केली या वर्षी सुद्धा या उपक्रमास प्रभागातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला व आनंदही घेतला.
माजी नगरसेवक राजेंद्र गावडे,सुरेश भोईर,अश्विनीताई चिंचवडे,भाजपा महिला अध्यक्षा उज्ज्वला गावडे,भाजपा जेष्ठ नेते रवींद्र देशपांडे,रवींद्र प्रभुणे,भारत केसरी विजय गावडे,युवा नेते,नरेश कदम,सागर चिंचवडे,ऍड:सारिका मोरे,डॉ, सोनाली सातव, यशवंत तांबे,अनिल गावडे,,मंदार सुळे, आदी मान्यवर प्रमुख म्हणून उपस्थित होते.
अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा उपक्रम म्हणजे आमच्यासाठी एक आगळा वेगळा आनंदाचा अनुभव वाटतो अश्या अनेक प्रतिक्रिया सहभागी नागरिकांनी दिल्या. महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे यांनी प्रास्थाविक केले. कु.श्रावणी बच्चे यांनी सूत्रसंचालन केले तर संस्थेचे मुख्य शरद कुंजीर यांनी सर्वाचे आभार मानले. सचिन शिरसे (प्रसिध्द मुर्तिकार) यांनी कार्यशाळेस मार्गदर्शन केले़.
आपण स्व:ता तयार केलेली बाप्पा ची मुर्ती पाहुन प्रत्येकांचा चेहऱ्यांवरील आंनद पाहण्याजोगा होता.,आपण दिलेल़्या प्रतिसादांबद्दल आपणांस सर्वाचे आभार मानत आहे.व अशाच वेगवेगळ्या सामाजिक , कला- सांस्कृतिक कार्यशाळा आयोजित करत राहु अशी ग्वाही आयोजकांच्या वतीने नागरिकांना दिली. शरद कुंजीर,अर्चना कुंजीर,कांचन निकुंभ,गणेश बच्चे,विशाल गोळी, रोहन फापाळे, कृष्णकांत देसाई,राहुल चौधरी,अक्षय रसाळ,ओकार कुंजीर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.