शिट्टीला तरुणाई, बालचमूंकडून प्रतिसाद
: आले रे आले राहुलदादा आले अशी आरोळी देत आणि शिट्ट्या वाजवीत चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे शनिवारी वाकड आणि पुनावळे परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जंगी स्वागत झाले.
अनेक सोसायट्यांमध्ये राहुलदादा कलाटे जाताच बालचमू त्यांचे निवडणूक चिन्ह असलेली शिट्टी वाजवून त्यांचे सोसायटीच्या द्वाराजवळच स्वागत करीत होते. वाकडमधील मानकर इम्पेरिया सोसायटीमधील युवतींनी शिट्टीचे चिन्ह असलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. लहान मुलेही त्यांचे शिट्ट्या वाजवून आंनदाने स्वागत करीत होती.
वाकडमधील शिवांगण, गणेश इम्पेरिया, स्पायरिया अशा अनेक सोसायट्यांमधील तरुणाई दादांसमवेत फोटो काढून घेण्यास उत्सुक असल्याचे दिसत होते. त्यातून हा उमेदवार कोणी बाहेरचा नसून त्यांच्यातीलच एक असल्याची भावना नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्यामुळे उमेदवारापासुन अंतर न राखता थेटपणे आपणही संवाद साधू शकतो, अशा प्रकारचा एक आत्मविश्वास सोसायट्यांमधील रहिवाशांमध्ये आणि तरुणाईमध्येही दिसून आला.
त्यानंतर पुनावळे येथील सारा मेट्रो व्हीले सोसायटीत दादा येताच सोसायट्यांमधील रहिवाशांनी सोसायटीच्या द्वाराकडे धाव घेत त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. चिंचवडमधील चिंचवडेनगर, बिजलीनगर, इंदिरानगर, दळवीनगर यासारख्या भागात बैठ्या घरांचे प्रमाण जास्त आहे. प्रामुख्याने मध्यमवर्गीय नागरिक येथे राहतात. राहुलदादा यांचे या भागातही नागरिकांनी चांगले स्वागत केले. या प्रत्येक ठिकाणी दादांची मोटर दिसताच लहान मुले जमून त्यांच्याजवळ शिट्टी वाजवून त्यांचे स्वागत करीत आनंदाने उड्या मारत होती. तसेच एकमेकांना जोरात शिट्ट्या वाजविण्याचे आवाहन करीत होती. जणू काही त्यांच्यामध्ये शिट्ट्या वाजविणायची स्पर्धाच लागली होती.
राहुल कलाटे यांच्या पदयात्रेस मोठा
प्रतिसाद
पिंपरी,ता. १९ : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी शनिवारी (ता. १८) सायंकाळी काढलेल्या पदयात्रेस नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. शेकडो मतदार या पदयात्रेत सहभागी झाले होते. यामध्ये तरुण, महिला, युवती अशा सर्वांचाच सहभाग लक्षणीय होता.
नखातेवस्ती, दत्तनगर कॉलनी, नखातेनगर, गजानन नगर, महाराष्ट्र नगरी, राहटणी फाटा, अमरदिप कॉलनी, श्रीनगर कॉलनी, छत्रपती चौक, रायगड कॉलनी, यशवंत कॉलनी, बळीराज कॉलनी, गोडांबे चौक, छत्रपती चौक,
साईविश्व चौक, आझाद चौक, जीवन चौक, क्रांतिवीर चौक, पवना चौक, पंचनाथ चौक, आठवण हॉटेल, अल्फान्सो शाळा, गणेश चौक, मोरया कॉलनी, पवनानगर, काळेवाडी संपूर्ण परिसर असा पदयात्रेचा मार्ग होता. या पदयात्रे दरम्यान राहुल यांचे ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी सुवासिनींनी औक्षण केले. दादांना ठिकठिकाणी हात उंचावून नागरिक अभिवादन करीत होते. कलाटे या अभिवादनाचा स्वीकार करीत होते.
‘येऊन येऊन येणार कोण? राहुल
दादांशिवाय आहेच कोण’ , ‘ एकच वादा, राहुलदादा ‘ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शिट्टी चे बटण दाबून प्रचंड मताधिक्याने दादांना विधानसभेत निवडून द्या, असे आवाहन कलाटे यांचे कार्यकर्ते करीत होते. सुमारे साडेतीन ते चार तास ही पदयात्रा चालली .पदयात्रे दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून कार्यकर्ते वाहनांना वाट करून देत होते.