राष्ट्रवादीचे अमन भैया शेख यांच्या वतीने शिवजयंती निमित्त १००० तुळशी रोपटे वाटप
शब्राम न्यूज : पिंपरी चिंचवड: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरी होत आहे या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे युवा नेते अमन भैया शेख यांच्या वतीने पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर परिसरात तुळशीचे रोपटे वाटप करण्यात आले आयुर्वेदिक विश्वात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक आजारांवर तुळशीचे औषध गुणकारी आहे तुळशीचे पूजनही प्रत्येक घरात केले जाते या शिवजयंती निमित्त तुळशीचे रोपटे वाटप करून एक आगळावेगळा उपक्रम अमन भैया शेख यांनी राबविला सदर उपक्रम असंघटित कामगार प्रदेश उपाध्यक्ष मीनाताई मोहिते पाटील व युवानेते शाम जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला
यावेळी अमन भैय्या शेख यांचा मित्रपरिवार तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व उपस्थितांचे आभार अमन भैया शेख यांनी व्यक्त केले.