शबनम न्युज | शिरगाव
सोमाटणे येथील ग्रामदैवत श्री चौराई देवी उत्सवाची पहिल्या दिवशी पहाटे महाभिषेक करून सुरुवात झाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. सायंकाळी पालखीतून देवीची छबिना मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी फुलांची उधळण करत ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.
उत्सवानिमित्त लोकनृत्य कार्यक्रम, लावणी महोत्सव, होम मिनिस्टर, मनोरंजनांचे कार्यक्रम होणार असून, ज्ञानेश्वर मेश्राम यांचा भजन व गीतांचा कार्यक्रम होणार आहे. याशिवाय विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नामवंत पहिलवानांच्या उपस्थितीत भव्य मैदानी कुस्ती स्पर्धा ही घेण्यात येणार असल्याची माहिती उत्सव कमिटी अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी दिली आहे.
Advertisement