शबनम न्युज | पुणे
पवना धरण पाटबंधारे कार्यालयातील शाखा अभियंतांची बदली करण्याची मागणी खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे शेतकऱ्यांनी केली आहे. धरण परिसरातील खाजगी व कायदेशीर बांधकामावरून नाहक त्रास देणे, शेतकऱ्यांचे पाणी परवाने काढण्यासाठी जाणीवपूर्वक शिफारस न देणे, जास्त पाणीपट्टी आकारणे ,पैशाची मागणी करणे, असे आरोप अभियंतावर स्थानिक शेतकऱ्यांनी केले आहे.
सततच्या दबावामुळे आणि सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांमुळे शेतकऱ्यांनी अभियंताच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांची कामे थांबवणे, अपशब्द वापरून त्रास देणे, नोटीसा देऊन त्रास देणे, अशा प्रकारचे आरोप अभियंतावर शेतकरी करत आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे शेतकऱ्यांनी अभियंताच्या बदलीची मागणी केली आहे.
Advertisement