शबनम न्युज | पिंपरी
पिंपरीत रिक्षा शिपने चालवण्यासाठी दिलेली असताना चालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निघोजे येथील डोंगर वस्तीत शनिवार (दि. १३) रोजी ही घटना घडली.
अभिषेक कैलास पन्हाळे (वय २३. रा.यवतमाळ) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अजित संजय राठोड (रा. डोंगर वस्ती निघोजे, ता.खेड ) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित याने रिक्षा फिर्यादी पन्हाळे यांना शिपणे चालवण्यासाठी दिली आहे. दरम्यान, ती रिक्षा पन्हाळे यांचा मित्र लखन उर्फ कल्लेश्वर वब्रुवानवाचणे याने नेली. ती रिक्षा शोधून दे नाहीतर, तिचे पैसे दे, असे म्हणत अजितने पन्हाळे यांच्याकडे पैशाची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुला घराबाहेर जाऊ देणार नाही, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. तसेच पन्हाळे यांना घराबाहेर जाऊ न देता प्रतिबंध केला. याबाबत अधिक तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस पोलीस करीत आहे.