शबनम न्युज | भोसरी
गुंतवणूक केल्यास 20 पटीने नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका व्यक्तीला 27 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केली, एमआयडीसी भोसरी परिसरात 26 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत ही घटना घडली.
विवेक भीमराव पाटील (वय 43 रा. चिंचवड) यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे फिर्यादी दिली. त्यानुसार दिपाली शर्मा, जय सहानी, आर्या शर्मा या संशयीताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयतांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क करून गोल्डमॅन सच या कंपनीत गुंतवणूक केल्यास एका महिन्यात 20 पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यातून पाटील यांनी संशयतेला 27 लाख 45 हजार रुपये पाठवले. याबाबत अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहे.