शबनम न्युज | पुणे
राज्यात गोळीबाळाच्या घटना सातत्याने घडत आहे. पुण्यात देखील कोयता गँगची दहशत सुरू आहे. कोयता गॅंगला पुन्हा डोके वर काढू देणार नाही, असे सांगितले जाते. परंतु कोयता गँगची दहशत पुणे परिसरात कायम आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच महाराष्ट्रातील सरकारमध्ये नेत्यांचा गुन्हेगारीला आशीर्वाद असल्याची टीका त्यांनी केली आहे. पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रविवारी सुप्रिया सुळे आल्या होत्या. अभिवादन नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाला की, अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर झालेली गोळीबाराची घटना ही धक्कादायक होती. मुंबईसारख्या ठिकाणी भर रस्त्यावर अशा प्रकारे गोळीबार होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे ‘अबकी बार गोळीबार सरकार’ या माझ्या वक्तव्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.