शबनम न्युज | पुणे
पुण्यात मुलाला एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन मिळवून देतो, असे सांगून तब्बल 70 लाखाचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सुनील नामदेव गडकर (वय 32, रा. आंबेगाव बुद्रुक) यांचे विरोधात विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 29 नोव्हेंबर 2023 ते 13 एप्रिल 2024 दरम्यान घडला आहे.
याबाबत राजेंद्र विठ्ठल बहिरट (वय 60 रा. कसबा पेठ) यांनी रविवार दिनांक 13 विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली. आरोपी सुनील गडकर यांनी फिर्यादीची भेट घेऊन मुलाला एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवून देण्याचे खोटे आश्वासन दिले. त्यासाठी कोरा चेक देऊन विश्व संपादन केला. त्यानंतर फॉर्म फिलिंग, इन्व्हाईस तिकीट अशी कारणे सांगून ऑनलाइन 58 लाख 79 हजार आणि रोख 10 लाख 90 हजार रुपये असे एकूण 69 लाख 70 हजार रुपये उकळले. सहाय्यक पोलीस निरीक्षक निंबाळकर पुढील तपास करीत आहेत.