शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
पुणे शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला अनेक मोबाईल चोरी केल्याप्रकरणी अटक केली आहे. हवालदार रणजित फडतरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी पुणे महापालिकेच्या (पीएमसी) बसस्थानकावर सापळा रचला.
पोलिसांनी सांगितले की, १६ वर्षांचा मुलगा बसस्थानक परिसरात संशयास्पदरीत्या फिरत होता आणि बॅग घेऊन जात होता. त्यांच्या चौकशीत त्याने काही दिवसांपूर्वी याच बसस्थानकात मोबाईल चोरी केल्याचे उघड झाले.
पोलीस पथकाने त्याच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल जप्त केला. पुढील तपासात त्याच्याकडून आणखी १७ मोबाईल जप्त करण्यात आले. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली होती. तो अल्पवयीन असल्याने त्याला अटक करण्यात आली नसून कायदेशीर प्रक्रियेनुसार त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.