शबनम न्युज | पुणे
पुणे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांना कायदा १९५१ कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान करण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांना असलेल्या महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३६ च्या अधिकारान्वये १० सप्टेंबर २०२२ च्या मध्यरात्रीपर्यंत पुणे पोलिसांना विविध अधिकार प्रदान केले आहे.
या अधिकारांतर्गत रस्त्यावरून जाणाऱ्या जर मिरवणुकीतील व्यक्तींचे वागणे जर कृत्य याबाबत निर्देश देणे, मिरवणुका किंवा जमाव कोणत्या मार्गाने जाईल जर जाणार नाही असे मार्ग व व्या निश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी जर सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या ध्वनीक्षेपकाची (लाऊड स्पीकर) वेळ, पद्धती, ध्वनी तीव्रता, आवाजाची दिशा यांचे नियंत्रण करणे, सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवताना उच्च न्यायालयाचे आदेशांचे पालन होण्याच्या अनुषंगाने लेखी किंवा तोंड निर्देश देण्याचे अधिकार पुणे पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात करण्यात आले आहे.