शबनम न्युज | पुणे
भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट (आयएमईडी )येथे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या ट्रेनिंग अँड लर्निंग अकॅडमी (अटल )च्या सहकार्याने फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम सुरू झाला आहे . ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग ची आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवस्थापनामध्ये आणि शिक्षणामध्ये उपयुक्तता ‘ या विषयावर हे दोन आठवड्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले .डॉ श्याम शुक्ला ,डॉ दीपक नवलगुंद, डॉ श्रद्धा वेर्णेकर यांनी संयोजन केले .अतुल कहाते, डॉ पी के मिश्रा ,प्रशांत राजोरे, मिथुन कुमार, विक्रम अरोरा, देवेंद्रदत्त मिश्रा या तज्ञांनी मार्गदर्शन केले. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेशी संलग्न संस्थांच्या प्राध्यापकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला.