शबनम न्युज | चिखली
हप्ता दिला नाही म्हणून एकास शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना महिंद्रा कंपनीतील शारदा मोटर्स येथे निघोजगावच्या हद्दीत चिखली, हवेली तालुक्यात ६ ऑक्टोबर रोजी घडली.
याप्रकरणी अब्दुलरब अदिसुल्ला शहा (वय ३५, रा. चिखली ता.हवेली) यांनी फिर्याद दिली असून १० ऑक्टोबर रोजी दिगंबर मोहिते, राणा दौंडकर आणि एक अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा स्क्रॅप खरेदीचा व्यवसाय आहे. आरोपी यांनी संगणमत करून महिंद्रा कंपनीतील शारदा मोटर्स येथील भंगार उचलण्याकरिता महिन्याला १५ हजार हप्ता दिला नाही म्हणून फिर्यादी यांचे ट्रक वरील ड्रायव्हर प्रकाश लेबर हयात, समशुल इस्लम शहा व बरकतअली जवाहरअली शहा यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. याबाबत अधिक तपास चाकण ( महाळुंगे) पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहे.