शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय येथील महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस महानगरपालिकेच्या वतीने सह आयुक्त आशादेवी दुरगुडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुख्य प्रशासकीय इमारतीमधील कार्यक्रमास सहाय्यक आरोग्याधिकारी राजु बेद, मुख्य आरोग्य निरीक्षक सुरेश चनाल, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक,अखिल महर्षि वाल्मिकी समाज,पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष राकेश राजोरीया, पदाधिकारी अमित सारसर, विधी सल्लागार ॲड.सागर चरण, सोनाथ बेद,मोहन बेद,रामपाल सौदा,अनिल लखन,राजू खैरे,विजेद्र आठवाल आदी उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील कार्यक्रमास अधिष्ठाता डाॅ.राजेंद्र वाबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक राजकुमार वाघमारे,रियल लाईफ रियल पीपल संस्थेचे एम.ए.हुसेन तसेच कर्मचारी उपस्थित होते.